
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार असून दुपारी एक नंतर आपल्याला तो पाहता येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचा निकाल उद्या दुपारी 5 मे 2025 एक नंतर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नउ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे निकाल आपल्याला खालील संकेतस्थळावर दुपारी एक नंतर पाहता येतील.
1.https://results.digilocker.gov.in
2.https://hscresult.mkcl.org
3.https://mahahsscboard.in
4.https://results.navneet.com
5.https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
6.https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-
7.https://www.indiatoday.in/education-today/results
8.https://www.aajtak.in/education/board-exam-results
9.https://results.targetpublications.org
वरील संकेतस्थळावरून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण आपल्याला पाहता येतील व त्याची प्रिंट काढता येईल. शिवाय डीजी लॉकर ॲप मध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निकालानंतर विद्यार्थ्यांना त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन करण्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रती मिळवण्यासाठी मंगळवार दिनांक 6 मे 2025 ते मंगळवार दिनांक 20 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
त्यासाठीचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
शिवाय उत्तर पत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रथम उत्तर पत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून, विविध शुल्क भरून मंडळाकडे अर्ज जमा करणे आवश्यक असेल.
या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, पुनर्परीक्षार्थीसाठी श्रेणी सुधारण्यासाठी बुधवार दिनांक 7 मे 2025 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरून घेतले जाणारा असून त्याबाबतचे वेळापत्रक स्वतंत्र दिले जाणार आहे या परीक्षा जून जुलै 25 मध्ये आयोजित करण्यात येणार आहेत



