FLash

छायाचित्रकार अवीवा बनणार गांधी-वाड्रा घराण्याची सून

छायाचित्रकार अवीवा बनणार गांधी घराण्याची सून

डिसेंबर २०२५ च्या अखेरीस काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रायहान वाड्रा यांनी त्यांची दीर्घकाळची प्रेयसी अवीवा बेगशी लग्न करण्याचे ठरवले आहे.

हे जोडपे गेल्या सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त आहे. कुटुंबाने ही माहिती गुप्त ठेवली असली तरी, अनेक वृत्तपत्रांनी याबाबत बातम्या दिल्या आहेत.
रायहानने अलीकडेच अवीवाला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि दोन्ही कुटुंबांनी लग्नाला पांठीबा दिल्याचे वृत्तांत आहे.
विवाह समारंभ: जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला राजस्थानमधील रणथंभोर येथे होण्याची अपेक्षा आहे.

यासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी लग्न आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सवाई माधोपूर (रणथंभोरजवळ) येथे आधीच पोहोचले आहे. ते हॉटेल शेर बागमध्ये थांबल्याचे वृत्त आहे.
अवीवा बेग ही दिल्ली येथील असून छायाचित्रकार आणि निर्माती आहे. मॉडर्न स्कूलमधून तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले आणि ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून मीडिया कम्युनिकेशन अँड जर्नलिझमचे शिक्षण घेतले.
अवीवाने इंडिया आर्ट फेअर २०२३ मध्ये ‘यू कान्ट मिस दिस’ आणि २०१९ मध्ये ‘द इल्युसरी वर्ल्ड’ यासारख्या अनेक प्रसिद्ध प्रदर्शनांमध्ये तिचे काम सादर केले आहे. ती अ‍ॅटेलियर ११ या क्रिएटिव्ह प्रोडक्शन युनिटची सह-संस्थापक देखील आहे आणि ती माजी राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/