डॉ कोमल गणगे यांचे सेट नेट मध्ये यश

लातूर दि. 23 (प्रतिनिधी )बऱ्याच मुलींना शिक्षणाची इच्छा असून देखील आई-वडिलांनी घेतलेल्या निर्णयापुढे आपली इच्छा बाजूला ठेवून आई-वडिलांच्या इच्छेला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांची शिक्षणाची इच्छा आणि जिद्द असताना सुद्धा अनेक मुली विवाहाला सामोरे जातात आणि शिक्षणापासून दूर जातात. पण याला अपवाद ठरल्या कोमल बापूराव लंगडे गणगे.
त्यांनी आई-वडिलांच्या इच्छा नुसार पदवी पूर्ण झाल्यानंतर लगेच विवाह केला आणि विवाहानंतर आपल्या शिक्षणाची जिद्द वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडताना एम कॉम आणि तदनंतर पी.एचडी. आणि त्यासोबतच सेट ,नेट सारख्या कठीण परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या आहेत.
त्यामुळे त्यांच्या या यशाचे कौतुक त्यांच्या परिवाराबरोबर इतरांकडूनही केले जात आहे. त्यांच्या अभिनंदनासाठी डॉ. मारुती कराळे ,अशोक गुरदाळे ,उषा गुरदाळे, डॉ संभाजी लोभे, स्नेहल लोंढे माधव गणगे हे उपस्थित होते.
त्यांनी राजस्थान येथील जे जे टी यु विद्यापीठातून कम्बाईन स्टडी ऑन कंजूमर डिसिजन मेकिंग प्रोसेस बिटवीन ई-कॉमर्स अँड एम कॉमर्स या विषयावर डॉ. राजेश कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली आपला संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यांचे शिक्षण दयानंद वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे.



