उद्योजक धर्मराज चावरे ‘मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानित

अहमदपूर येथील सोनालिका ट्रॅक्टर व ट्रेलर्सचे संचालक, युवा उद्योजक धर्मराज चावरे यांना कृषी व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते ‘मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गेल्या ३१ वर्षांपासून शेतकरी आणि शेतीला पूरक यंत्रसामग्रीच्या क्षेत्रात चावरे यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
धर्मराज चावरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे, नगराध्यक्ष स्वप्निल हत्ते, उपनगराध्यक्ष आयाज शेख, शिवकुमार सोनटक्के, गुंडप्पा तत्तापुरे, ओम भाऊ पुणे, राम तत्तापूरे, धनराज चावरे, ज्ञानोबा बडगीरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



