FLash

६४० आपले सरकार सेवा केंद्रां’साठी ऑनलाईन अर्ज


जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-गव्हर्नन्स विभागामार्फत जिल्ह्यात नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील तालुके, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रांमधील एकूण ६४० रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या केंद्रांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदार किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १२ वी) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असून, एमएससीआयटी किंवा सीसीसीचे प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य दिले जाईल. अर्जदार संबंधित ग्रामपंचायत किंवा शहरी क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा. याशिवाय उमेदवाराकडे आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक खाते व आवश्यक ओळखपत्र असणे गरजेचे आहे. अर्जदारावर नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत कोणताही ठपका किंवा दोष सिद्ध झालेला नसावा.

या प्रक्रियेसाठी अर्ज संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवारांनी अर्जासाठी दिलेल्या पोर्टलला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ०५ वाजेपर्यंत असणार आहे.

सेवा केंद्राशी संबंधित सविस्तर जाहिरात, नियम आणि अटी जिल्हा प्रशासनाच्या https://latur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांशी कोणताही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नसल्याने अद्ययावत माहितीसाठी अर्जदारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट द्यावी. या केंद्रांची मंजुरी, निवड प्रक्रिया, केंद्र वाटप आणि इतर सर्व बाबींविषयी अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय सेतू समितीचे अध्यक्ष यांच्याकडे राखीव यांच्याकडे राखीव असतील.
अर्ज करण्यासाठी ची आवश्यक कागदपत्रे पात्रता याविषयी सविस्तर माहिती खालील लिखित द्वारे मिळेल.
https://cdn.s3waas.gov.in/s317e62166fc8586dfa4d1bc0e1742c08b/uploads/2026/08/17876348886669.pdf

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/